कल्याण अवती-भवती

कल्याण अवती-भवती

Published on

आषाढी एकादशीला मराठी मनाचा कॅनव्हास
डोंबिवली : आषाढी एकादशीनिमित्त रविवारी (ता. ६) मायबोली साजिरी मराठी मनाचा कॅनव्हॉस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यातून माय मराठीचे विविध सांस्कृतिक पैलू अभिवाचनात्मक सांगीतिक रीतीने उलगडून दाखवण्यात येणार आहेत. डॉ. मेघा विश्वास यांची संकल्पना, निर्मिती असलेला हा कार्यक्रम डोंबिवलीतील सर्वेश सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे.
.......................
गुरुवंदन कार्यक्रमाचे आयोजन
डोंबिवली : गणेश मंदिर संस्थानच्या वतीने सामुदायिक गुरू पौर्णिमा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये नृत्य साधनानिकेतनच्या संचालिका प्राजक्ता बर्वे यांची ‘गुरुवंदन २०२५’, ही डॉ. संत राजकुमार केतकर यांच्या शिष्यांची नृत्य वंदना आयोजित केली आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी (ता. ४) संध्याकाळी ५ ते ९ या वेळेत डोंबिवलीतील गणेश मंदिर संस्थानच्या वक्रतुंड सभागृहात होणार आहे.
.....................
माळशेज घाटात रात्रीचा प्रवास जीवघेणा
कल्याण (वार्ताहर) : माळशेज घाटातील रात्रीचा प्रवास हा अतिशय जीवघेणा ठरत आहे. पावसाळ्यात तर धुके व‌ पावसामुळे दरीच्या बाजूचे संरक्षक भिंत व कठडे दिसत नसल्याने वाहनचालकांना अक्षरश: कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्यास अपघाताची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे घाटातील दरीच्या बाजूला असलेल्या संरक्षक भिंती व कठडे यावर रिफ्लेक्टर लावण्यात यावे, अशी मागणी आम्ही नगरकर, मुंबई संघ यांच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे करण्यात आली आहे. यावर त्वरित कार्यवाही करावी, अथवा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी माहिती आम्ही नगरकर प्रतिष्ठान कार्य अध्यक्ष बजरंग तांगडकर यांनी दिली.
...........
आशियाई बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने नवनाथ रणखांबे सन्मानित
कल्याण (वार्ताहर) : साहित्यिक नवनाथ रणखांबे यांचे शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेले जीवन संघर्ष आणि प्रेम उठाव या पुस्तकांची आशियाई बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. या दोन्ही पुस्तकांची माध्यमातून जोरदार चर्चा झाली. मराठी साहित्य क्षेत्रात ‘प्रेम उठाव’ या काव्यसंग्रह पुस्तकावर परीक्षणे, आभिप्राय, समीक्षा कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त समीक्षक, साहित्यातील जाणकार, सुज्ञवाचकांनी केली असून, ती दर्जेदार दैनिके, साप्ताहिके, मासिकांमध्ये प्रकाशित झाली आहेत. प्रेम उठाव या पुस्तकावरील १७१ परिक्षणांची ऐतिहासिक विश्वविक्रमाची नोंद आणि जीवन संघर्ष पुस्तकावरील २३१ परिक्षणांची ऐतिहासिक नोंद आशियाई बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. मराठी साहित्य क्षेत्रात एक अनोखे ऐतिहासिक विश्व रेकॉर्ड निर्माण झाले आहे. त्यामुळे नवनाथ रणखांबे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
..................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com