एमडी ड्रग्ज प्रकरणातील फरार ''फरहान'' अखेर जेरबंद

एमडी ड्रग्ज प्रकरणातील फरार ''फरहान'' अखेर जेरबंद

Published on

ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद
बहरीनला पळून जाण्याआधी हैदराबाद विमानतळावर अटक
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ : बदलापूर-तळोजा मार्गावरील खोणी पलावा परिसरातून मागील आठवड्यात पोलिसांनी दोन कोटी १२ लाख रुपये किमतीचे १.९३ किलो एमडी ड्रग्ज जप्त केले होते. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. यातील एक आरोपी फरार होता. तो बहरीनला पळून जाण्याच्या बेतात असतानाच हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून त्याला अटक करण्यात आली. मोहम्मद रहिम सलीम शेख ऊर्फ फरहान (वय ३२) असे अटक आरोपीचे नाव आहे.

मानपाडा पोलिस ठाण्यात २७ जून रोजी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात यापूर्वी असिल जावर सुर्वे (वय २६), मोहम्मद इसा मोहम्मद हनीस कुरेशी आणि महिला आरोपी मेहेर फातिमा रिजवान देवजानी या तिघांना अटक केली होती. यातील मुख्य आरोपी फरहान हा गुन्हा घडल्यानंतर फरार होता. तो बाहेर परदेशात पळून जाणार असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली होती. मानपाडा पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार विमानतळावर सापळा रचला.

२९ जूनला फरहान परदेशात पळून जाण्याच्या तयारीत होता. हैदराबाद येथील विमानतळावर त्याला ताब्यात घेण्यात आले. बहरीन या देशात जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला मानपाडा पोलिसांनी अटक केली. त्याला कल्याण न्यायालयात हजर केले असता, ७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. फरहान हा मुंब्रा येथे वास्तव्यास असून, चारचाकी वाहनांच्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

सखोल तपास सुरू
फरहान परदेशात अमली पदार्थांची तस्करी करीत होता का, अन्य काय व्यवसाय करीत होता याचा सखोल तपास सुरू आहे. त्याच्याविरुद्ध मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, ही कारवाई कल्याण परिमंडळ ३चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान शिंदे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com