सार्वजनिक बांधकाम विभाग अखेर सावरला

सार्वजनिक बांधकाम विभाग अखेर सावरला

Published on

दिनेश गोगी : सकाळ वृत्तसेवा
उल्हासनगर, ता. ६ : काही महिन्यांपासून ग्रहणाच्या विळख्यात सापडलेला उल्हासनगर महापालिकेतील सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांअभावी आणि एकमेव प्रभारी कार्यकारी अभियंता संदीप जाधव यांच्या स्वेच्छानिवृत्तीने बेवारस होणार की काय?असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, राज्य सरकारने प्रतिनियुक्तीवर पाठवलेले नीलेश शिरसाठे यांनी नुकतेच कार्यकारी अभियंता पदाचा पदभार स्वीकारला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचा कोणताही अनुभव नसताना अभियांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता हनुमंत खरात यांच्याकडे प्रभारी शहर अभियंता पदाचा पदभार सोपवण्यात आला. त्यांनी संदीप जाधव यांच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली. मात्र, जाधव यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. घरी आई-वडील आजारी असतानाही महापालिकेत येणारे जाधव यांनी स्वेच्छानिवृत्ती का घेतली? त्यांच्यावर कुणी दबाव टाकत होते काय? हा पालिकेच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
दरम्यान, प्रतिनियुक्तीवर नीलेश शिरसाठे यांची कार्यकारी अभियंता पदावर नियुक्ती केली होती. महिना उलटून गेला तरी ते रुजू झाले नव्हते. सार्वजनिक बांधकाम विभागात कोणी नसल्याने एकमेव कायमस्वरूपी कनिष्ठ अभियंता सुयश बांगर यांच्यासोबत कंत्राटी तरुण कनिष्ठ अभियंता हर्षद प्रधान, अश्विनी गर्जे, सुमेध चौगुले, सुशांत पेवेकर हे आयुक्त मनीषा आव्हाळे, उपायुक्त विशाखा मोटघरे, प्रभारी शहर अभियंता हनुमंत खरात यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज हाताळत होते. मात्र, आता शिरसाठे यांनी कार्यकारी अभियंता पदाचा पदभार स्वीकारला आहे. सध्या त्यांच्यासमोर दुरवस्था झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे, विकासकामांना गती देण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

कामात सावळागोंधळ
सार्वजनिक बांधकाम विभाग वादाच्या भोवऱ्यात सापडत असल्याने दीड वर्षापूर्वी प्रतिनियुक्तीवरील कार्यकारी अभियंता प्रशांत सोलंखी यांनी बदली करून घेतली होती. मात्र, राज्य सरकारकडून कोणताही अधिकारी उल्हासनगरात येण्यास तयार होत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागातील स्थानिक अधिकारी संदीप जाधव आणि तरुण शेवकानी यांनी आळीपाळीने अभियंता पद हाताळले. त्यात कामात सावळागोंधळाचा ठपका ठेवून सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरच तरुण शेवकानी यांना निलंबित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com