वूलन चाळीत गोमांसाची खुलेआम विक्री

वूलन चाळीत गोमांसाची खुलेआम विक्री

Published on

अंबरनाथ, ता. ३ (वार्ताहर) : अंबरनाथच्या वूलन चाळ परिसरात खुलेआमपणे गोमांसाची विक्री केली जात असल्याचे अनेकदा समोर आले. या दुकानांवर पोलिसांनी कारवाई करूनही विक्री सुरू असल्याने आता विक्री करणाऱ्यांना थेट तडीपार करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात होती. या संदर्भात सध्या दुकानांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी पालिकेकडे केली.
अंबरनाथ पश्चिमेचा वूलन चाळ हा मुस्लिमबहुल भाग आहे. या भागातून जाणाऱ्या रस्त्यावर गोमांस विक्रीची किमान आठ ते दहा दुकाने आहेत. कुणी मटण दुकानाचे फलक लावून गोमांस विकतो. तर कुणी बीफ शॉपचे फलक लावलेले दिसत आहे. हे विक्री करणारे कोणत्या न कोणत्या राजकीय पक्षांशी संबंधित आहे. त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली, तरी राजकीय आशीर्वादाने ती पुन्हा सुरू होतात. पोलिसांनी २८ मे रोजी या दुकानांवर छापा टाकत १३ गोमांस विक्रेत्यांना बेड्या ठोकल्या होत्या. यात मनसेचे पदाधिकारी युसूफ शेख, शिवसेनेशी संबंधित जलाल शेखचा मुलगा सकलेन शेख, कमरुद्दीन शेख, जाफर खान आणि करीम अब्दुल करीम शेख या पाच दुकान मालकांसह रियाज शेख, मोहम्मद फजल, अबू मोहम्मद, आझाद कुरेशी, फिरोज कुरेशी, अश्फाक कुरेशी, पप्पू कुरेशी आणि फारूक शेख अशा एकूण १३ जणांचा समावेश होता. धक्कादायक बाब म्हणजे यापैकी अनेकांवर यापूर्वी गोमांस विक्रीचे आणि अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र, तरीही पोलिसांनी कारवाई केल्यावर जामीन मिळताच हे सगळे पुन्हा गोमांस विक्री सुरू करतात. त्यामुळे आता यांच्या दुकानांचे परवाने रद्द व्हावेत, अशी मागणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी पालिकेकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com