स्विगी डिलिव्हरी बॉयच दुचाकीचोर!
उल्हासनगर, ता. ३ (वार्ताहर) : रोज आपल्या घरापर्यंत खाद्यपदार्थ पोहोचवणारा स्विगी डिलिव्हरी बॉय प्रत्यक्षात दुचाकीचोर निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उल्हासनगर गुन्हे शाखेच्या दक्षतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. आकाश नागरे याला अटक केली असून त्याच्याकडून एक दुचाकी जप्त केली आहे.
उल्हासनगर गुन्हे शाखेने दुचाकी चोराचा तपास सुरू केला होता. त्यासोबतच सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली. त्यावेळी चोराचा चेहरा स्पष्ट झाला. त्याच आधारे नागरेला त्याच्या राहत्या परिसरातून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, त्याने अंबिवली परिसरातील बुलेटही चोरल्याची कबुली दिली. ही बुलेट त्याने मोहम्मद इराणी या साथीदाराच्या मदतीने चोरल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन खात्री केली, असता आरोपी बुलेटसह फरार झाल्याचे आढळले. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीरंग गोसावी, पोलिस हवालदार अमर कदम, मंगेश जाधव, पोलिस शिपाई रामदास उगले, प्रसाद तोंडलिकर आणि संजय शेरमाळे यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.