जुईनगरमध्ये रविवारी विठ्ठलदर्शन सोहळा
जुईनगर, ता. ३ (बातमीदार) : जुईनगरमध्ये संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सामाजिक संस्थेच्या वतीने विठ्ठलदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार (ता. ६) आषाढी एकादशीनिमित्त संगीत भजनाच्या जयघोषात दर्शन सोहळा पार पडणार आहे. जुईनगर सेक्टर २५ येथील गावदेवी चौकात सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत नागरिकांना विठ्ठलाचे दर्शन घेता येणार आहे. येणाऱ्या भाविकांसाठी फराळाचे वाटप संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. १५ वर्षांपासून संस्थेमार्फत विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती स्थापन करून जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाही, त्यांच्यासाठी दर्शन सोहळा व फराळवाटप करण्यात येतो. येथील नागरिकांना आषाढी एकादशीनिमित्त या परिसरात पंढरपूरनगरी अवतरल्याचा भास होतो. विठ्ठल भक्तांना दिवसभर ही सेवा देताना अत्यानंद होत असल्याची भावना संस्थेचे अध्यक्ष जालिंदर औटी, उपाध्यक्ष भानुदास बारवे, सचिव मच्छिंद्र रोडे, उपसचिव संतोष गायकर, आत्माराम सूर्यवंशी, बाळासाहेब शिंगोटे यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.