चिकू विमा प्रक्रियेसाठी मुदतवाढ

चिकू विमा प्रक्रियेसाठी मुदतवाढ

Published on

वाणगाव (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात दरवर्षी अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे चिकूचे अतोनात नुकसान होते. त्यासाठी चिकू बागायतदारांसाठी विमा संरक्षण उपलब्ध आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार प्रायोजित पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना अंतर्गत चिकू फळपिकासाठी विमा संरक्षण दिले जाते. बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनीकडे पालघर जिल्ह्यातील चिकू विम्याची जबाबदारी देण्यात आली आहे. चिकू उत्पादकांनी ३० जूनपर्यंत फळपीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी मुदत होती, परंतु केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणींची दखल घेत मुदतवाढ दिल्याने जिल्ह्यातील चिकू उत्पादक शेतकऱ्यांना चिकू विमा प्रक्रियेत ६ जुलैपर्यंत सहभागी होता येणार आहे. www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करता येणार आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com