हिंदी सक्ती रद्द केल्यानंतर बदलापुरात जल्लोष

हिंदी सक्ती रद्द केल्यानंतर बदलापुरात जल्लोष

Published on

बदलापूर, ता. ३ (बातमीदार) : राज्य सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्द झाल्यानंतर बदलापूर शहरात मनसेने ढोल-ताशांच्या गजरात विजयाचा एकच जल्लोष साजरा केला. मराठी शक्तीपुढे हिंदी सक्तीचा पराभव झाल्याने आम्ही आता विजयोत्सव साजरा करणार, अशी सकारात्मक भूमिका राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. त्यामुळे येत्या ५ तारखेला मुंबईत विजयोत्सव साजरा केला जाणार आहे. हिंदी सक्तीचा जीआर रद्द झाल्यानंतर बदलापूर शहरातून मनसेने विजयोत्सव साजरा केला. गांधीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत गांधीनगर ते बदलापूर पश्चिम बाजारपेठेत ढोल-ताशांच्या गजरात विजयी मिरवणूक काढण्यात आली. बाजारात प्रत्येक माणसाला पेढे भरवत हा आनंद साजरा करण्यात आला. या वेळी मनसे शहराध्यक्ष निशांत मांडवीकर, महिला शहराध्यक्षा संगीता चेंदवणकर यांच्या नेतृत्वाखाली युवा पदाधिकारी प्रथमेश म्हात्रे सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com