बेशिस्त चालकांना ३३ लाखांचा दंड
नवी मुंबई, ता. ३ (वार्ताहर) : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात सीवूड्स वाहतूक शाखेने जूनमध्ये विशेष मोहीम राबवून तीन हजार ३९३ वाहनचालकांवर कारवाई केली. या वाहनचालकांवर ३२ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावून त्यापैकी ११ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
सीवूड्स वाहतूक शाखेकडून वाहतूक सुरक्षेबाबत, तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर नियमितपणे कारवाई करण्यात येते. जूनमध्ये सीवूड्स वाहतूक शाखेने पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तीन हजार ३९३ वाहनांवर कारवाई केली. या कारवाईत वाहनचालकांवर तब्बल ३२ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावून त्यापैकी ११ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पाम बीच मार्गावरील, तसेच सीवूड्स आणि नेरूळ रेल्वेस्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सीवूड्स वाहतूक शाखेकडून विशेष उपाययोजना करण्यात आल्या. त्यामुळे स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. या विशेष मोहिमेत मुख्यतः विनाहेल्मेट वाहन चालवणे, सिग्नल तोडणे, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे, नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणे, कर्कश आवाज करणारे सायलेन्सर वापरणे, तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकावर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती सीवूड्स वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहिनी लोखंडे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.