झाड पडून तीन वाहनांसह दोन दुकानांचे नुकसान

झाड पडून तीन वाहनांसह दोन दुकानांचे नुकसान

Published on

झाड पडून तीन वाहनांसह दोन दुकानांचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : झाडे आणि झाडाची फांदी तुटून पडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन दुकानांसह तीन वाहनांचे नुकसान झाले आहे. यामध्ये दोन चारचाकी आणि एका दुचाकीचा समावेश आहे. सुदैवाने या घटनांमध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. या घटना वसंत विहार, पाचपाखाडी आणि नौपाडा परिसरात घडल्या.
वसंत विहार, सिद्धांचल सोसायटीच्या ऑफिसजवळ झाड चारचाकी गाडीसह दुचाकीवरती पडले. ही घटना गुरुवारी (ता. ३) साडेबारा वाजण्याच्या सुमारास समोर आली. यामध्ये गाड्यांचे किरकोळ नुकसान झाले आहे. दुसरी घटना, पाचपाखाडी, नामदेव वाडीजवळ घडली. या घटनेत गोरसगृह या दुकानाच्या आवारातील झाड एक हॉटेल आणि दुकानाच्या शेडवरती पडले. ही घटना बुधवारी (ता. ३) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली असून, शेड तुटून किरकोळ नुकसान झाले आहे. तसेच, हे झाड आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुमारे तीन तासांच्या प्रयत्नानंतर कापून बाजूला करण्यात आले, तर तिसरी घटना नौपाडा, घंटाळी परिसरात घडली. या ठिकाणी ब्राम्हण शिक्षण मंडळ शाळेच्या आवारामधील झाडाची फांदी एका गाडीवर बुधवारी (ता. २) रात्री पडली. यात गाडीची काच फुटून नुकसान झाले आहे. या घटनांची माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व वृक्ष प्राधिकरण विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली होती, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com