विद्यार्थी तारप्यावरून प्रवास करीत गाठतात शाळा

विद्यार्थी तारप्यावरून प्रवास करीत गाठतात शाळा

Published on

रायकर पाडा येथील विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास
शिकण्यासाठी तराफ्यावरून प्रवास करीत गाठतात शाळा
वाडा, ता. ३ (बातमीदार) : सोनाळे ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रायकर पाड्यामधील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दररोज तराफ्याच्या साह्याने वैतरणा नदीचा अर्धा तासाचा प्रवास करून सोनाळे गावात शाळा गाठावी लागते. वारा, पाऊस व नदीच्या पाण्यात कपडे वह्या, पुस्तक ओली होतात. अशा परिस्थितीत डोक्यावर भीतीची टांगती तलवार असतानाही हे विद्यार्थी मनाशी जिद्द बाळगत शाळेत जाऊन धडे गिरवत आहेत.
गायकर पाड्यातील १५ विद्यार्थी सोनाळा हायस्कूल, दोन विद्यार्थी जि. प. शाळा कापरी, एक विद्यार्थी वाडा कॉलेज अशा एकूण १८ विद्यार्थ्यांना रोज शिक्षणासाठी हा प्रवास करून जावे लागते. त्यासाठी पावसाळ्यात रुद्रावतार धारण केलेली वैतरणा नदी या विद्यार्थ्यांना तराफ्यावरून पार करावी लागते. नदीवर पूल नसल्याने हा अतिशय धोकादायक प्रवास विद्यार्थी करतात. विद्यार्थ्यांबरोबरच गरोदर माता, आबालवृद्ध, रुग्ण, नागरिक यांचीही गैरसोय होत असून, जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

या गावाकडे जाण्यासाठी वैतरणा नदीवर पूल होणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमचे प्रयत्न सुरू आहेत. या गावातील विद्यार्थ्यांची शाळेच्या ठिकाणी सोनाळे येथील वसतिगृहात तर मुलींची कंळभे येथील मुलींच्या वसतिगृहात व्यवस्था करणार आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.
- कुंदन भोईर, ग्रामपंचायत अधिकारी, सोनाळे

पूल होऊन मुलाबाळांची गैरसोय दूर व्हावी, यासाठी अधिकाऱ्यांकडे वारंवार हेलपाटे मारले. परंतु आमची कोणी दादच घेत नाही. त्यामुळे आम्हाला संघर्षमय जीवन जगावे लागत आहे.
- विनोद हाडळ, ग्रामस्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com