वर्ल्ड पोलिस अँड फायर स्पर्धेत सुभाष पुजारी यांना दोन सुवर्ण
वर्ल्ड पोलिस अँड फायर स्पर्धेत सुभाष पुजारी यांना दोन सुवर्ण
घाटकोपर, ता. ३ (बातमीदार) : वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम २०२५ या अमेरिकेतील बरमिंगहम, आलाबामा येथे झालेल्या स्पर्धेत नवी मुंबई पोलिस दलातील पोलिस निरीक्षक सुभाष पुजारी यांना दोन सुवर्ण पदक पटकावली. ही पदके बॉडी बिल्डिंग या प्रकारात मिळाली आहेत. सुभाष पुजारी हे या स्पर्धेसाठी दररोज ६ तास मिस्टर ऑलिम्पिया सुनीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत होते. अमेरिकेतील या स्पर्धेसाठी तब्बल ७६ देशातील संघानी सहभाग घेतला होता. आतापर्यंत त्यांनी १० आंतरराष्ट्रीय पारितोषिके पटकावली आहेत. या स्पर्धेसाठी नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यासह ठाणे शहर पोलिस उपायुक्त श्रीकांत पाठक, नवी मुंबई ११२ डायल पोलिस हेल्पलाईन विभागाच्या अधीक्षक प्रीती टिपरे, रागिणी पुजारी, आनंद गुप्ता व विवेक गुप्ता, डॉ. कनिष्क जैन व डॉ.असीम माथन, सुदर्शन खेडकर, ऋषी पेणकर यांचे सहकार्य लाभले आहे.
MUM25E96496
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.