ऐरोलीत सोसायटीची सुरक्षा भिंत खचली

ऐरोलीत सोसायटीची सुरक्षा भिंत खचली

Published on

वाशी, ता. ३ (बातमीदार) : ऐरोली सेक्टर २० येथील शिवप्रसाद सोसायटीच्या इमारतीची सुरक्षा भिंत कोसळल्याची घटना गुरुवारी (ता. २) सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. त्यामुळे भिंतीजवळ उभ्या असलेल्या दुचाकींचे मोठे नुकसान झाले. या घटनेत महानगर गॅसच्या पाइपलाइनलाही गळती लागली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ऐरोली सेक्टर २० येथील शिवप्रसाद सोसायटीच्या बाजूला एका खासगी बांधकाम व्यावसायिकाचे काम सुरू आहे. या बांधकामाचा पाया बांधण्यासाठी खड्डा खोदण्यात आला आहे; पण या बांधकाम व्यावसायिकाच्या कामाचा फटका शिवप्रसाद सोसायटीच्या सुरक्षा भिंतीला बसला आहे. या खड्ड्यामुळे सुरक्षा भिंत खचून बुधवारी पहाटे कोसळली. भिंतीजवळ पार्क करण्यात आलेल्या सात ते आठ दुचाकीही त्या खड्ड्यात पडल्या. त्यामुळे वाहनमालकांचे नुकसान झाले. या घटनेत येथील महानगर गॅसच्या वाहिनीला गळती लागल्यामुळे येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई अग्निशमन दलाच्या पथकाला तत्काळ पाचारण करण्यात आले. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी दक्षता घेत महानगर गॅसची मुख्य वाहिनी तत्काळ बंद करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com