तुर्भे एमआयडीसीतील सिल्वर पॅरेडाईज बारवर छापा

तुर्भे एमआयडीसीतील सिल्वर पॅरेडाईज बारवर छापा

Published on

तुर्भे एमआयडीसीतील सिल्वर पॅरेडाईज बारवर छापा
नवी मुंबई, ता. ३ (वार्ताहर) : नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने बुधवारी रात्री तुर्भे एमआयडीसीतील सिल्वर पॅरेडाईज (लक्षदीप) बार ॲन्ड रेस्टारंटवर छापा मारला. या वेळी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अश्लील हावभाव व अंगविक्षेप करणाऱ्या १४ महिला वेटर तसेच पाच पुरुष वेटर आणि बारमधील मॅनेजर, कॅशिअर अशा एकूण १९ जणांवर कारवाई करून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
तुर्भे एमआयडीसीतील सिल्वर पॅरेडाईज (लक्षदीप) बार ॲन्ड रेस्टॉरंटमधील महिला वेटर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गैरकृत्य करत असल्याची माहिती मिळताच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश देशमुख, पोलिस उपनिरीक्षक सरीता गुडे व त्यांच्या पथकाने बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास बारवर छापा मारला. या वेळी बारमधील महिला वेटर या तोकडे व बिभत्स कपडे घालून ग्राहकाजवळ बसून अश्लील वर्तन व त्यांच्यासोबत अंगलट करत असल्याचे दिसून आले. तसेच बार विहीत वेळेपेक्षा जास्त वेळ सुरू ठेवण्यात आल्याचे आढळून आले. या वेळी बारमधील मॅनेजर आणि पुरुष वेटर हे महिला वेटरना ग्राहकांसोबत अश्लील वर्तन करण्यास प्रोत्साहित करताना आढळून आले. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने बारमधील १४ महिला वेटर, पाच पुरुष वेटर, तसेच बार चालक, मॅनेजर आणि कॅशिअर, अशा एकूण १९ जणांना ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com