मद्यधुंद कचरावेचक पडला नाल्यात

मद्यधुंद कचरावेचक पडला नाल्यात

Published on

मद्यधुंद कचरावेचक पडला नाल्यात
कल्याण, ता. ३ (बातमीदार) : खडेगोळवली परिसरात एक मद्यधुंद व्यक्ती तोल जाऊन मोठ्या नाल्यात पडल्याची घटना गुरुवारी (ता. ३) दुपारच्या सुमारास घडली. नाल्यात पडल्यानंतर मदत मिळेपर्यंत त्या व्यक्तींने दोन्ही हातांनी कठड्याला पकडून ठेवले होते. ही बाब स्थानिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती कळवली. यानंतर या व्यक्तीच्या बचावासाठी मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

प्रवीण पवार असे या कचरावेचक मद्यधुंद व्यक्तीचे नाव असून, तो प्लॅस्टिकच्या बाटल्या गोळा करीत असताना तोल जाऊन नाल्यात पडला होता. अवघ्या पाच ते दहा मिनिटांतच घटनास्थळी पोहोचत अग्निशमन दलाच्या जवानांनी बचाव मोहीम सुरू केली. सुरुवातीला पुलावरूनच या कामगाराला येण्याकरिता शिडी लावली होती; मात्र मद्यधुंद अवस्थेत कठड्याला धरलेले हात सोडून शिडी पकडणे जिकिरीचे असल्याचे लक्षात येताच जवानांनी दुसऱ्या बाजूने स्वतः नाल्यात उतरण्याची तयारी केली आणि त्याला सुखरूप नाल्याबाहेर काढले.

नाल्याबाहेर येताच त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यात त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसून, तो सुखरूप आहे. यानंतर उपस्थित पोलिसांनी या व्यक्तीची अधिक चौकशी केली. सकाळी झालेल्या जोरदार पावसाने नाल्याच्या पात्रात बऱ्यापैकी प्रवाह होता. या व्यक्तीने वेळेत कठडा पकडला नसता तर तो वाहून जाण्याची दाट शक्यता होती. नागरिकांनी अशा ठिकाणी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत अधिक सतर्क राहण्याचे आवाहन घटनास्थळी उपस्थित असलेले ‘५/ड’ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश यमगर यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com