जव्हार शहरात २६ दुकानांवर कारवाई
जव्हार, ता. ३ (बातमीदार) : स्वच्छ सुंदर आणि हरित जव्हार शहरात अतिक्रमणाने रुपडे पार अस्वच्छ केले होते. अतिक्रमण हटाव मोहीम राबवावी, असे अनेकदा निवेदन देऊन अनेक वर्षे स्थानिक रहिवाशांनी मागणी केली होती, मात्र त्यावर कारवाई होण्यास प्रशासन सपशेल टाळाटाळ करीत होते. अखेर मंगळवार (ता. १)पासून नगरपरिषद प्रशासन आक्रमक होत आज (ता. ३) तिसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होती. २६ दुकानांवर कारवाई करताना एका बेकरी व्यावसायिकाकडून पाच हजारांचा दंड आकारत प्लॅस्टिक पिशव्या हस्तगत करण्यात आल्या.
शहरातील जिमखाना हॉल परिसर, डॉ. सदगीर गल्लीपासून भाजी मार्केट, यशवंत नगर मोर्चा परिसर, राम मंदिर मुख्य रस्त्यापासून गांधी चौकपर्यंत अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. या वेळी प्रशासकीय व्यवस्थेने मोबाईल बंद ठेवण्यात धन्यता मानली, जेणेकरून कुणीही या कारवाईदरम्यान हस्तक्षेप करणार नाही, असे मुख्याधिकारी मानिनी कांबळे यांनी सांगितले. अतिक्रमणविरोधी मोहीम राबवतेवेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरातील नागरिकांनी नगरपरिषदेच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.