मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कोंडीमुक्त
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील कोंडीमुक्त
सातिवली उड्डाणपुलाच्या सेवा रस्त्यामुळे प्रवास सुखकर
मनोर, ता. ३ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सातिवली गावाच्या हद्दीतील निर्माणाधीन उड्डाणपुलामुळे होत असलेली वाहतूक कोंडी सोडवण्यात प्रशासनाला यश आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या पालघर जिल्हा दौऱ्यानंतर महामार्गावर निर्माण झालेली वाहतूक कोंडीची समस्या १० दिवसांनी सुटली आहे. जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महामार्ग सुरक्षा पोलिस आणि जिल्हा वाहतूक शाखेच्या प्रयत्नांमुळे यश आले आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून महामार्गावरून वाहतूक कोंडीमुक्त प्रवास होत असल्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निर्देशानुसार ठेकेदाराने काम सुरू केले होते. सातिवली उड्डाणपुलावर काँक्रीटीकरणाचे काम सुरु करून दोन दिवसांत पूर्ण करण्यात आले. यामुळे आठवडाभरात काँक्रीटीकरण केलेल्या मार्गिकेवरून वाहतूक सुरू झाली आहे. त्यानंतर गुजरात वाहिनीवरील सेवा रस्त्याच्या एका मार्गिकेच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू करून तीन दिवसांत पूर्ण करण्यात आले आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून वाहतूक कोंडीमुक्त प्रवास होणार असल्यामुळे वाहनचालक आणि प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले आहे.
------------------------------
वाहनांच्या रांगा
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघर तालुक्यातील सातिवली गावाच्या हद्दीतील उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी महामार्गावरील वाहतूक सर्व्हिस रोडवर वळवण्यात आली आहे. सलग १० दिवस महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. महामार्गाच्या दोन्ही वाहिन्यांवर १० ते १५ किलोमीटर लांबीच्या रांगा लागत होत्या. वाहतूक कोंडीतून सुटका मिळवण्यासाठी वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सुरुवात केली होती.
---------------------
पर्यायी रस्ता
विरार, मारंबळपाडा ते टेम्बी खोडावे खरवाडेश्री जेट्टी, दहिसर बहाडोली-धुकटण रस्ता, पारगाव-सोनावे-दारशेत-सकवार रस्ता, चहाडे-तांदूळवाडी-पारगाव-वरई रस्ता आदी पर्यायी रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढली होती.
---------------------------------------
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महामार्ग सुरक्षा पोलिस, वाहतूक शाखेच्या संयुक्त प्रयत्नांनी महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यात यश आले आहे. सातिवली उड्डाणपुलाच्या सर्व्हिस रोडच्या काँक्रीटीकरणाचा निर्णय घेऊन दोन्ही बाजूची एक-एक मार्गिका काँक्रीटीकरण करण्यात आल्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही, यासाठी दक्षता घेतली जात आहे.
- सुहास चिटणीस, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण
------------------------------------------
फोटो सुहास चिटणीस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.