तीन महिन्यांत १२० कोटींची कर वसुली
विरार, ता. ३ (बातमीदार) : वसई-विरार महापालिकेच्या पहिल्या तिमाहीमध्ये १२० कोटींची मालमत्ता कर वसुली केली आहे. मागच्या वर्षी मार्च अखेरपर्यंत पालिकेने ३९४ कोटी, तर गेल्यावर्षी जुलै अखेर १०० कोटींची वसुली झाली होती. त्या तुलनेत यंदा २० कोटींची अधिक वसुली झाल्याने पालिकेच्या तिजोरीमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे.
पालिका हद्दीतील विविध विकास कामांसाठी लागणारा निधी हा करामधूनच गोळा केला जातो. त्यासाठी पालिका परिसरातून जास्तीत जास्त करवसुलीवर प्रशासनाचा भर असतो. या आर्थिक वर्ष अखेर मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य ८११ कोटींचे निर्धारित करण्यात आले आहे. त्यापैकी पहिल्या तिमाहीमध्ये पालिकेच्या तिजोरीत १२० कोटी जून अखेरपर्यंत जमा झाले आहेत. येणाऱ्या काळात ही वसुली वाढविण्यावर पालिका प्रशासनाचा भर राहणार असल्याचे सांगण्यात आले, मात्र मालमत्ता करातून मोबाईल टॉवरना शासकीय आदेशाने वगळण्यात आल्याने पालिकेला जवळपास २२ कोटींचे नुकसान होणार असल्याचे सांगितले जात आहे.
चालू आर्थिक वर्ष अखेरपर्यंत जास्तीत जास्त मालमता कराची वसुली करण्यात येणार आहे. त्यासाठी आमचे सर्व प्रयत्न सुरू आहेत. ठिकठिकाणी जाहिरात करणे, रिक्षातून भोंग्यावरून नागरिकांना कर भरण्याचे आवाहन करणे, सिनेमागृहामधून कर भरण्याची चित्रफीत दाखविणे, स्थानिक केबलवरून आवाहन करत आहाेत. थकबाकीदारांनी कर न भरल्यास जप्तीची कारवाई करत लिलाव करून कर वसूल करण्यात येणार आहे.
- अनिलकुमार पवार, आयुक्त, वसई-विरार महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.