१७ धरणे पूर्ण क्षमतेने भरली
तीन दिवस सतर्कतेचा इशारा
अलिबाग, ता. ३ (वार्ताहर) ः रायगड जिल्ह्यातील १७ धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून अनेक गावांमधील पाणीटंचाईची समस्या मिटली आहे. पावसाने चांगली साथ दिल्याने शेतकरीही आता लावणीच्या कामाला लागला आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
यंदा मे महिन्यापासूनच पावसाने दमदार सुरुवात केली. जूनमध्ये सुरुवातीला काही दिवस पावसाने विश्रांती घेतली. मात्र त्यानंतर पुन्हा जोर धरला. यामुळे धरणांमधील पाणीसाठा वाढला आहे. मे व जून या दोन महिन्यात एकूण ७१४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रायगड पाटबंधारे विभागाच्या सुतारवाडी, पाभरे, संदेरी, खिंडवाडी, कोथुर्डे, खैरे, वरंध, कोंडगाव, उन्हेरे, कवेळे, भिलवले, वावा, फणसाड, घोटवडे, कलोते- मोकाशी, डोणवत व आंबेघर ही धरणे १०० टक्के भरली आहेत.
तालुकानिहाय पावसाची नोंद:
अलिबाग ६३ मिमी., मुरूड २५ मिमी., पेण ५७ मिमी., पनवेल ६८.६ मिमी., उरण ६७ मिमी., कर्जत १२३ मिमी., खालापूर ८९ मिमी., माथेरान १५३ मिमी., सुधागड १०६ मिमी., माणगाव ८० मिमी., तळा ८३ मिमी., महाड ७८ मिमी., पोलादपूर १२६ मिमी., श्रीवर्धन २५ मिमी., म्हसळा ६० मिमी., रोहा १२६ मिमी., एकूण पावसाचे प्रमाण १३२९.६ मिमी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.