व्यापारी मारहाणीचा मुद्दा तापण्याची शक्यता

व्यापारी मारहाणीचा मुद्दा तापण्याची शक्यता

Published on

व्यापारी मारहाणीचा मुद्दा तापणार
मिरा-भाईंदर प्रकरणानंतर मनसे आक्रमक
भाईंदर, ता. ३ (बातमीदार) : मराठी न बोलण्याच्या मुद्द्यावर मिरा रोडमधील व्यापाऱ्याला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेच्या निषेधार्थ मिरा-भाईंदरमधील व्यापाऱ्यांनी गुरुवारी बंदची हाक दिली. दुसरीकडे मनसेनेही आक्रमक भूमिका घेत व्यापाऱ्यांनी काढलेला मोर्चा हा भाजपप्रणित असल्याचे म्हटले. भाजप हा पक्ष मराठी माणसाच्या विरोधात असल्याचा मुद्दा घरोघरी जाऊन सांगणार असल्याचे मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले.
राज्य सरकारने हिंदीसक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर रविवारी रात्री मनसेच्या वतीने मिरा-भाईंदरमध्ये जल्लोष करण्यात आला. या वेळी मिठाई घेण्यासाठी मनसेचे उपशहराध्यक्ष करण कांडणगिरे व इतर पदाधिकारी मिरा रोड येथील एका मिठाईच्या दुकानात गेले. तेथील कर्मचारी त्यांच्याशी हिंदीत बोलल्याने मनसैनिकांना राग आला. महाराष्ट्रात राहायचे असेल, तर मराठीतच बोलावे लागेल, असा दम त्यांना दिला. या वेळी दुकानमालक बाबुलाल चौधरी यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, तसेच महाराष्ट्रात सर्वच भाषा बोलल्या जात असल्याचे म्हटल्यानंतर मनसैनिकांनी त्यांनाही मारहाण केली. याविरोधात चौधरी यांनी तक्रार दिल्यानंतर काशी मिरा पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी गुरुवारी मिरा-भाईंदर बंदची हाक दिली. तसेच त्यांनी पोलिस उपायुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याची तयारी केली होती; मात्र तत्पूर्वीच पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी व्यापाऱ्यांची भेट घेत शांततेचे आवाहन केले. मोर्चा न काढण्यावर एकमत झाल्यानंतरही रात्री व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. या मोर्चामागे भाजपचाच हात असल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला.
----
मराठी एकीकरण समितीची उडी
दरम्यान, मराठी एकीकरण समितीनेही या वादात उडी घेतली आहे. या प्रकरणात दुकाने बंद ठेवून व मोर्चा काढून पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न व्यापारी करीत आहेत. यासाठी शुक्रवारी (ता. ४) सायंकाळी पोलिस उपायुक्तांची भेट घेण्यात येणार आहे. या वेळी सर्व मराठी भाषिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com