रेल्वे स्थानकावर  वडापाव महागला!

रेल्वे स्थानकावर वडापाव महागला!

Published on

रेल्वेस्थानकावर वडापाव महागला!
आता मोजा १८ रुपये
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : मुंबईकरांच्या रोजच्या धावपळीतील सोबती असलेला वडापाव आता थेट पाच रुपयांनी महागला आहे. पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवरील स्टॉल्सवर विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांचे भाव पश्चिम रेल्वे प्रशासनाने सुधारित केले असून, १ जुलैपासून हे नवे भाव लागू झाले आहेत. वडापाव यापुढे १३ ऐवजी १८ रुपयांना मिळणार आहे.
सुधारित भावानुसार एक बटाटावडा १५ रुपये आणि पाव तीन रुपये असा नवा भाव निश्चित करण्यात आला आहे. मागील भावाप्रमाणे बटाटावडा १० आणि पाव तीन रुपये असा होता. रेल्वे बोर्डाच्या निर्देशानुसार सहा महिन्यांनी भावांचा आढावा घेणे आवश्यक असते. २०२१ नंतर प्रथमच भाववाढ झाली आहे. स्टॉलधारक संघटनांच्या मागणीनंतर आणि वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ही भाववाढ मंजूर करण्यात आली आहे. लिंबू आणि कोकम सरबताच्या भावात सरळ कपात करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात ही ‘घटवलेली किंमत’ नव्हे तर ‘घटवलेलं प्रमाण’ आहे. आधी सहा रुपयांना २०० मि.ली. मिळणारे सरबत आता पाच रुपयांना केवळ १५० मि.ली. दिले जात आहे.

असे आहेत सुधारित भाव
पश्चिम रेल्वेस्थानकांवरील स्टॉल्सवर आता दाबेली (२० रु.), चायनीज भेल (३० रु.), व्हेज हॉट डॉग (३५ रु.), व्हेज पफ (३५ रु.), शेवपुरी (४५ रु.), व्हेज चीज टोस्ट सॅन्डविच (५० रु.), पनीर/चीज रोल (५० रु.) आणि ग्रील क्लब सॅन्डविच (८० रु.) असे नवे पदार्थही विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

भरडधान्यांचे पदार्थ प्रथमच रेल्वेस्थानकात
भारताने २०२३ हे ‘आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष’ म्हणून साजरे केले होते. त्यानंतर आता पश्चिम रेल्वेने पहिल्यांदाच स्थानकांवरील स्टॉल्सवर भरडधान्यांचा समावेश केला आहे. याअंतर्गत थालीपीठ (१०० रु.), खाकरा (७५ रु.), चकली (७५ रु.), पोहा (१०० रु.) आणि कूकीज (२५ रु.) हे पर्याय प्रवाशांसाठी खुले करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com