पालिका निवडणूकीत आघाडी करण्यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय होणार
आघाडीसंदर्भातील निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार
वर्षा गायकवाड यांची माहिती
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ ः मुंबई महापालिका निवडणुकीत आघाडी करायची की स्वबळावर लढायचे याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतील; मात्र अद्याप त्याबाबत कोणत्याही हालचाली आता सुरू नाहीत, अशी स्पष्ट भूमिका मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी मांडली.
मुंबईत निवडणुकीचे वातावरण तयार होऊ लागले आहे. शनिवारी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे एकत्र शक्तिप्रदर्शन होणार आहे. दोघे भाऊ एकत्र आल्याचे काँग्रेसने त्याचे स्वागत केले आहे. लोकसभा आणि विधानसभा महाविकास आघाडी म्हणून लढवल्या होत्या. आता महापालिका निवडणूक आल्याने या निवडणुकीत आघाडी होईल काय, असा सवाल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार वर्षा गायकवाड यांना केला असता, त्या म्हणाल्या की, लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढलो. तो प्रयोग काही प्रमाणात यशस्वी झाला; मात्र आता निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढवायची की स्वबळावर लढायचे याबाबत आमचे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. आमच्या मुंबईतील सर्व मतदारसंघांत मोर्चेबांधणी करीत आहोत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
...
भ्रष्टाचाराची होणार पोलखोल!
मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना मुंबईत महापालिकेच्या भूखंडांच्या पुनर्विकास कामाच्या अंतर्गत व इतर विकासकामांत सुरू असलेले घोटाळे, भ्रष्टाचार यांची दर आठवड्याला पोलखोल करणार असल्याचा निर्धार खासदार गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.