खालापूर तीन धरणे तुडुंब

खालापूर तीन धरणे तुडुंब

Published on

खालापूर तीन धरणे तुडुंब
१९०० मिलिमीटर पावसाची नोंद; सिंचनासह औद्योगिक वापरासाठी मुबलक पाणी


खालापूर, ता. ३ (बातमीदार) : लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेली तालुक्‍यातील भिलवले, कलोते-मोकाशी आणि डोणवत धरण १०० टक्के भरले आहेत. सिंचनासाठी, औद्योगिक वापरासाठी तसेच अनेक गावाच्या पेयजल योजना या धरणांवर अवलंबून असल्याने पाण्याची समस्या मिटणार आहे.
भिलवले धरणातील कालव्याचा फायदा चौक भागातील उन्हाळी शेती करणाऱ्या भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना होतो. कलोते-मोकाशी धरणाच्या उजवा आणि डावा कालव्यामुळे खालापूरचा ग्रामीण व शहरी भागातील शेतीचा प्रश्न मिटणार आहे. याशिवाय कलोते मोकाशील धरणातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे इमॅजिका पार्कसाठीही मोठ्या प्रमाणात पाणी उचलले जाते. खोपोली-पेण मार्गावर असलेले डोणवत धरणावर १४ गावांच्या पाणी योजना असून या भागातील कारखान्याची दररोजची लाखो लिटर पाण्याची मागणी हे धरण पूर्ण करणार आहे.

तालुक्यात आतापर्यंत सरासरी १९०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून गतवर्षीच्या तुलनेत धरणातील पाणीसाठा प्रचंड वाढला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात भिलवले धरण ९६ टक्के, कलोते-मोकाशी धरण ३५ टक्के व डोणवत धरण ३४ टक्के भरले होते. यंदा मात्र पहिल्या आठवड्यातच धरणे दुधडी भरून वाहू लागली आहे.

धरणातील पाणी क्षमता
भिलवले
क्षमता-२.१०० दलघमी
पूर्ण संचय पातळी-५४.३५ मीटर

कलोते-मोकाशी
क्षमता-४.१९०दलघमी.
पूर्ण संचय पातळी-८१.०० मीटर
डोणवत
क्षमता-३.६७०
पूर्ण संचय पातळी-६३.४० मीटर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com