आमदार सुनील प्रभू यांना पितृशोक
वामन प्रभू यांचे निधन
मुंबई, ता. ३ ः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, आमदार सुनील प्रभू यांचे वडील वामन प्रभू (वय ८६) यांचे गुरुवारी (ता. ३) दुपारी २ वाजता राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. बोरिवली (पूर्व) दौलत नगर स्मशानभूमीत रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन पुत्र, सुना, नातवंडे, आप्तस्वकीय असा परिवार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंत्यदर्शन घेतले आणि प्रभू यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. या वेळी आमदार अजय चौधरी, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार अनंत (बाळा) नर, आमदार मनोज जामसूतकर, आमदार महेश सावंत, माजी आमदार विनोद घोसाळकर, माजी आमदार विलास पोतनीस, उपनेते अमोल कीर्तिकर, कामगार नेते अभिजित राणे, शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे आदींनी अंत्यदर्शन घेतले. सर्वपक्षीय मान्यवर नेते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.