आमदार किसन कथोरे यांच्या घरासमोर गोळीबार!
आमदार किसन कथोरे यांच्या घरासमोर गोळीबार!
बदलापूर, ता. ३ (बातमीदार) : शहरात दिवसाढवळ्या एका व्यक्तीवर भाजप आमदार किसन कथोरे यांच्या घरासमोर अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला आहे. या गोळीबारात अल्ताफ शेख नामक युवक गंभीर जखमी झाला. त्याला बदलापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर गाव येथे राहणाऱ्या अल्ताफ शेखचे शहरातील काही टोळक्यासोबत जागेवरून वाद सुरू होते. आज दुपारी या प्रकरणावरून वाद पराकोटीला गेल्याने भाजप आमदार किसन कथोरे यांच्या घरासमोरच त्याच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. यात अल्ताफ गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर बदलापुरात एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आमदारांच्या घरासमोर हा प्रकार घडल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, गोळीबार कोणत्या कारणास्तव घडला, हे अद्याप समोर आलेले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.