चार जणांची टोळी जेरबंद

चार जणांची टोळी जेरबंद

Published on

एकात रात्रीत दोन दुकाने फोडणारी टोळी जेरबंद
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : एकाच रात्री सख्ख्या भावांची दुकाने फोडणाऱ्या चार जणांची टोळी ठाणे ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केली आहे. शहापुरातील संकेत गटल्या वाघे आणि त्याचे साथीदार बळीराम वामन मुकणे, बळीराम अशोक मुकणे आणि प्रसाद ऊर्फ पच्ची लक्ष्मण परटोले या चौकडीला पोलिसांनी अटक केली. दरम्यान, चोरीला गेलेले आठ मोबाईल, एक लॅपटॉप आणि एक घड्याळ असा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे.
भिवंडी तालुक्यातील वडवली येथील गणेश वारघडे यांचे वासिंद पोलिस ठाणे हद्दीत जियांशी मोबाईल शॉप या नावाने दुकान आहे. तसेच त्यांचा भाऊ मयूर वारघडे यांचेदेखील वासिंदमध्येच न्यू जियांशी मोबाईल शॉप आहे. ही दोन्ही दुकाने गुरुवारी (ता. २६) रात्री अज्ञातांनी फोडून त्यातील ६८ हजार रुपये किमतीचे मोबाईल, लॅपटॉप व इतर वस्तू चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी वासिंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यानुसार ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, शहापूर उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खास पोलिस पथक तयार करण्यात आले. गोपनीय माहिती, तांत्रिक माहिती व घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्या चार जणांच्या टोळीचा पर्दाफाश करून त्यांना शिताफीने अटक केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रावसाहेब वाघ करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com