सुप्रिया सुळेंना महायुतीत सामावून घेण्याची केंद्रीय मंत्र्यांची इच्छा
बदलापूर, ता. ३ (बातमीदार) : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या हरहुन्नरी संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे या हुशार आहेत. भविष्यात त्यांनी महायुतीत येण्याचा विचार करावा, असे म्हणत महायुतीचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सुप्रिया सुळे यांना महायुतीत येण्यासाठी जणू साद घातली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा वाढदिवस ३० जूनला होता. त्यांचा वाढदिवस देशभरात त्यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी साजरे करत असतात. मात्र, आपल्या चांगल्या स्वभावाने विरोधकांची मनेही त्यांनी जिंकली आहेत. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आठवले यांनी भविष्यात सुप्रिया सुळे हे आमच्यासोबत येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेतील मृत्युमुखी पावलेल्या दीपक पाठक यांच्या बदलापुरातील घरी आठवले यांनी परत भेट दिली. त्या वेळेस त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. केंद्रीय मंत्र्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेनंतर आता सुप्रिया सुळे यांची त्यावर काय प्रतिक्रिया असेल? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.