ईडीकडून आर्किटेक्ट आणि मध्यस्थांकडून १२ कोटी रुपये जप्त

ईडीकडून आर्किटेक्ट आणि मध्यस्थांकडून १२ कोटी रुपये जप्त

Published on

ईडीने गोठवले १२ कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार
विरार, ता. ४ (बातमीदार) : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी (ता. १) वसई-विरार शहरातील वास्तुविशारद, सनदी लेखापाल, लायझनर्स आणि बांधकाम व्यावसायिकांच्या निवासस्थानी केलेल्या कारवाईत बँकांतील १२ कोटी ७१ लाख रुपयांची रक्कम (बचत खाते, मुदत ठेवी आणि म्युच्युअल फंड) गोठवली आहेत. तर २६ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. नालासोपारा-आचोळे येथील ४२ अनधिकृत इमारत प्रकरणांत वसई विरार महापालिका नगररचना विभागाचे निलंबित संचालक वाय. एस. रेड्डी यांच्या चौकशीत मिळालेल्या माहितीतून ईडीने ही कारवाई केली आहे.
दरम्यान, या बांधकाम प्रकरणात पालिका अधिकारी, बांधकाम व्यावसायिक आणि वास्तुविशारदांचे संगनमत असल्याचे पुरावे ईडीच्या हाती लागले आहेत. कारवाईदरम्यान अनेक लॅपटॉप, आयपॅड, मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय गोपनीय कागदपत्रे, मालमत्तांचे दस्तावेज, पावत्या, करारनामे तसेच ध्वनिफीत इत्यादी महत्त्वाचा दस्तावेज ईडीच्या हाती लागलेला आहे. शहरातील इमारतींना बांधकाम परवानगी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याचे यातून उघड झाले आहे. बांधकाम घोटाळ्यातील काळा पैसा पालिकेत वळवला जात होता, असे निरीक्षण ईडीने नोंदवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com