पुरात अडकलेल्या एकाला वाचवण्यात यश

पुरात अडकलेल्या एकाला वाचवण्यात यश

Published on

पुरात अडकलेल्या नागरिकाला वाचवण्यात यश
विक्रमगड, ता. ४ (बातमीदार) : देहरजे नदीवरील पूल पार करताना पांडुरंग मेरे (रा. हातणे) पुराच्या पाण्यात अडकले होते. या वेळी स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
पांडुरंग मेरे शुक्रवारी (ता. ४) सकाळी साडेनऊच्या सुमारास देहरजे गावातून शिळकडे जात होते. त्या वेळी देहरजे नदीवरील पूल पार करताना पाण्याचा अंदाज न आल्याने तसेच अचानक नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने मेरे पुलाच्या मधोमध अडकले होते. याबाबतची माहिती मिळताच विक्रमगड तहसीलदार मयूर चव्हाण व प्रशासन आणि शिळ, देहरजे गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत दोराच्या सहाय्याने त्यांना पाण्याच्या प्रवाहातून सुरक्षित बाहेर काढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com