अलिबाग-वडखळ मार्गावर शनिवार-रविवारी अवजड वाहतूक बंद
अलिबाग-वडखळ मार्गावर शनिवार-रविवारी अवजड वाहतूक बंद
अलिबाग, ता. ४ (वार्ताहर) : जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे येणाऱ्या मोठ्या प्रमाणातील पर्यटकांच्या सुरक्षित प्रवासासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अलिबाग ते वडखळ राष्ट्रीय महामार्गावर दर शनिवार आणि रविवारी जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे, अशी अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.
या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात पर्यटक आपल्या खासगी वाहनांद्वारे येत असल्याने दर आठवड्याच्या शेवटी येथे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होते. यामुळे रुग्णवाहिकांना अडथळा तसेच अपघाताची शक्यता वाढते. पोलिस अधीक्षक रायगड यांनी सुचविलेल्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. या बंदीत जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने, रुग्णवाहिका, पोलिस वाहने, फायर ब्रिगेड, महिला सशक्तीकरण मोहिमेसाठी नेमलेली वाहने यांना मुभा असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.