राज्यातील लाखो होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा

राज्यातील लाखो होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा

Published on

लाखो होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा
महाराष्ट्र वैद्यक परिषदेत नोंदणी होणार

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : राज्यातील सुमारे एक लाख होमिओपॅथी डॉक्टरांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. मॉडर्न फार्माकोलॉजीचा (सीसीएमपी) कोर्स पूर्ण केलेल्या डॉक्टरांची नोंदणी आता अधिकृतपणे महाराष्ट्र वैद्यक परिषद (एमएमसी)च्या पुस्तकात केली जाणार आहे. त्याबाबतचा निर्णय एमएमसीने घेतला आहे.
राज्यात २०१६पासून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत सीसीएमपी कोर्स सुरू असून, आतापर्यंत १५ हजारांहून अधिक डॉक्टरांनी हा कोर्स पूर्ण केला आहे. सीसीएमपी कोर्स पूर्ण झालेल्या डाॅक्टरांची एमएमसीकडे नोंदणी केल्याने त्यांना ॲलोपॅथी प्रॅक्टिसला कायदेशीर मान्यता मिळणार आहे. महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यक व्यवसायी आणि महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (सुधारणा) अधिनियम, २०१४नुसार या डॉक्टरांची नोंदणी आवश्यक आहे; परंतु त्याकडे दुर्लक्ष होत होते. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सरकारकडे पाठपुरवा करतानाच ११ मार्च रोजी पत्रव्यवहार करीत नोंदणीची मागणी केली होती. त्यानुसार सीसीएमपी कोर्स पूर्ण केलेल्या डॉक्टरांची नोंदणी आता अधिकृतपणे महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या पुस्तकात करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी डॉ. दिनेश साळुंके यांनीदेखील महत्त्वाची भूमिका बजावली. पूर्वी या डॉक्टरांना ॲलोपॅथी औषधांच्या वापराची कायदेशीर परवानगी नव्हती. मात्र सीसीएमपी कोर्सनंतर त्यांना ही परवानगी राज्य सरकारने दिली आहे. आता महाराष्ट्र वैद्यक परिषदेत अधिकृत नोंदणीही सुरू झाल्यामुळे ही प्रॅक्टिस अधिकृत, कायदेशीर व सुरक्षित ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com