१५ वर्षीय अल्पवयीन पीडितेवर ६ मित्रांचा शारीरिक अत्याचार
अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार
महिलेसह सात अल्पवयीन आरोपींवर गुन्हा दाखल
भिवंडी, ता. ४ (वार्ताहर) : एका १५ वर्षीय घरकाम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सात जणांनी वेगवगेळ्या ठिकाणी नेऊन जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केल्यामुळे पीडित गर्भवती राहिली. याप्रकरणी सात नराधमांसह घरकाम करण्यास ठेवणारी महिला अशा आठ जणांविरोधात शुक्रवारी (ता. ४) शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामधील सात आरोपी हे अल्पवयीन आहेत.
निजामपुरा हद्दीत राहणाऱ्या सुलताना सद्दाम दळवी हिने पीडित अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही तिला घरकामासाठी घरात राबवून घेतले आहे, तर तिच्या विधी संघर्ष मुलाने प्रथम पीडितेला त्याच्या राहत्या घरी तसेच तो सध्या राहात असलेल्या निजामपुरा येथील घरात तिच्यावर अत्याचार केला. तसेच त्याने त्याच्या अल्पवयीन मित्रांच्या मदतीने पिराणी पाडा येथील एका गाळ्यात आणि त्यानंतर खेळण्याच्या बहाण्याने तिच्या घराच्या परिसरातील गाळ्यात नेत पीडितेचा विनयभंग तसेच शारीरिक अत्याचार केला. यामुळे पीडित गर्भवती राहिली आणि हा प्रकार समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
पीडितेच्या फिर्यादीवरून शुक्रवारी आठ जणांविरोधात शांतीनगर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये व पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील महिलेसह सर्व अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महिलेस भिवंडी न्यायालयात, तर सर्व सात आरोपींना बाळ न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अतुल अडुरकर यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.