हिंदी सक्तीच्या परित्रकाच्या होळीप्रकरणी तीनशे जणांविरोधात गुन्हा
हिंदीसक्तीच्या परित्रकाच्या होळीप्रकरणी ३०० जणांविरोधात गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : हिंदी भाषेच्या सक्तीप्रकरणी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाची उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख डाॅ. दीपक पवार यांनी प्रतीकात्मक होळी करीत निषेध नोंदवला होता. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी डाॅ. दीपक पवार यांच्यासह संतोष शिंदे, संतोष घरात, वैभव मयेकर, शशी पवार, युगेंद्र साळेकर, संतोष वीर यांच्यासह २५० ते ३०० जणांविरोधात शुक्रवारी (ता. ४) गुन्हा नोंदवला आहे.
राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाची होळी केल्याप्रकरणी सूरज धोंडीराम खोत (वय ३२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी हा गुन्हा नोंदविला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जून रोजी दुपारी दोन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास मराठी पत्रकार संघासमोरील रस्त्यावर प्राथमिक शिक्षणातील तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात अन्यायकारक शासन निर्णयाची प्रतीकात्मक होळी या मागणीसाठी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता व पोलिस आयुक्तांच्या जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन करीत आंदोलन छेडले गेले. बेकायदा एकत्र येत घोषणाबाजी करीत शासन निर्णयाची होळी केली. त्यामुळे संबंधितांविरोधात गुन्हा नोंदवला आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.