भांडुपमध्ये अॅमेझॉनच्या डिलिवरी बॉयच्या आत्महत्येप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा
भांडुपमधील आत्महत्याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा
पैशांसाठी मारहाण, मानसिक छळ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : भांडुप खिंडीपाडा येथे वास्तव्याला असेलला ॲमेझाॅनचा डिलिव्हरी बाॅय शिवम विनोद तिवारी (वय २३) याने नुकतीच आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत त्याच्या सहकाऱ्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ॲमेझॉन कंपनीचे डिलिव्हरी न झालेले इतरांचे पार्सल शिवमच्या आयडीवरून जबरदस्तीने रिजेक्ट करण्यास सांगून, पैशांसाठी मारहाण आणि मानसिक छळ केल्याचा आरोप या आरोपींवर आहे. आत्महत्याप्रकरणी पोलिसांनी कोपरखैरणेतील आरोपी सोनू यादव (वय २९), मुलुंडचा चेतन गौतम (वय ३४) दोन्ही ॲमेझॉन कंपनी कर्मचाऱ्यांसह शिवमचा मित्र ओमकार मोरे (वय २८) आणि त्याने शिवमला मारहाण करण्यासाठी पाठविलेले अनिकेत घाडी (वय २४), धनराज ऊर्फ गणेश निकाळजे (वय २४), गौतम ढेकळे (वय २३) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, यातील तक्रारदार सत्यम तिवारी (वय २०) भांडुप खिंडीपाडा परिसरात कुटुंबीयांसोबत राहतात. त्यांचा मोठा भाऊ शिवम हा २०२३ पासून ॲमेझॉन कंपनीसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होता.
...
असे घडले प्रकरण
महिनाभरापूर्वी यादव आणि गौतमने घरी येत शिवमने डिलिव्हरी केलेल्या मालाचे ७५ हजार रुपये भरले नसल्याचे सांगत शिवीगाळ करत धमकी दिली. धमकीला घाबरून वडील विनोद यांनी त्यांना पूर्ण पैसे दिले. त्यानंतर गेल्या १५ दिवसांपासून शिवम हा रोज रात्री कामावरून घरी आल्यानंतर अस्वस्थ दिसू लागला. कुटुंबीयांनी शिवमकडे चौकशी केली असता त्याने ॲमेझॉन कंपनीमध्ये डिलिव्हरी न झालेले इतरांचे पार्सल यादव आणि गौतम हे जबरदस्तीने त्याच्या आयडीवरून रिजेक्ट मारण्यास सांगतात. जास्त पार्सल रिजेक्ट केल्याने त्याचा आयडी कधीकधी कंपनीकडून ब्लॉक होतो. पार्सल रिजेक्ट न मारल्यास तसेच डिलिव्हरी केलेल्या मालाचे पैसे कंपनीमध्ये न भरता घरी नेल्यास दोघेही त्याला फोन करून शिवीगाळ करत होते. शिवमने त्याचा मित्र ओमकारकडून कामानिमित्त ३० हजार रुपये घेतले होते. पैसे परत करण्यासाठी ओमकार त्याला वारंवार फोन आणि मेसेज करून शिवीगाळ आणि मारण्याची धमकी देत होता. यामुळे तो नैराश्येत होता. कुटुंबीयांनी त्याची समजूत काढली होती; पण तो तणावात होता. २ जुलैच्या संध्याकाळी कामावरून घरी आलेला शिवम प्रचंड मानसिक तणावाखाली होता. रात्री ९ वाजता अनिकेत, धनराज आणि ढेकळे हे शिवमला मारण्यासाठी त्याच्या घराजवळ आले होते; मात्र त्यांना पैसे परत करतो, असे सांगितल्यावर ते निघून गेले. त्यानंतर शिवमने घरातच गळफास घेत आत्महत्या केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.