मलिकांविरुद्ध आरोपांच्या चौकशीचा अहवाल सादर का केला नाही ?

मलिकांविरुद्ध आरोपांच्या चौकशीचा अहवाल सादर का केला नाही ?

Published on

मलिकांबाबतचा अहवाल सादर का केला नाही?
अंबोली पोलिसांना नोटीस

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः केंद्रीय महसूल अधिकारी समीर वानखेडे यांची बहीण यास्मिन हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याविरुद्ध बदनामी आणि पाळत ठेवल्याच्या आरोपांप्रकरणी केलेल्या तक्रारीसंदर्भात चौकशी अहवाल का सादर केला नाही, अशी विचारणा महानगर दंडाधिकारी न्यायालयाने शुक्रवारी (ता. ४) केली आणि अंबोली पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावली. 
अंधेरी न्यायालयात २०२१ मध्ये यास्मिन यांनी तक्रार दाखल केली होती. नंतर ती वांद्रे येथील न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडे वर्ग करण्यात आली होती. वानखेडे यांच्या बहिणीने मलिक यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीची जानेवारी महिन्यात न्यायालयाने दखल घेतली होती. तसेच फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम २०२अंतर्गत अंबोली पोलिसांना आरोपांच्या चौकशीचे आदेश देऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते; परंतु पोलिसांनी अद्याप हा अहवाल सादर केला नाही. त्यामुळे वांद्रे येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आशीष आवारी यांनी पोलिसांना अहवाल सादर का केला नाही, अशी विचारणा करून कारणे दाखवा नोटीस बजावली. 
...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एक्स आणि विविध वृत्तवाहिन्यांना मुलाखती देताना आपल्याविरुद्ध खोटे, बदनामीकारक आरोप केल्याचा दावा यास्मिन यांनी तक्रारीत केला होता. मलिक यांनी बदनामी केल्याच्या दाव्याचे समर्थन करणाऱ्या व्हिडिओ आणि फोटोही तक्रारीसह जोडले होते. या फोटोमध्ये आपण एका अमली पदार्थ विक्रेत्यासह असल्याचा दावा मलिक यांनी केला होता. प्रत्यक्षात ती व्यक्ती अमली पदार्थविक्रेता नसून आणि फोटोशी छेडछाड केल्याचा दावा यास्मिन यांनी केला होता. याप्रकरणी मलिक यांच्याविरोधात आपण पोलिसांत अनेकदा तक्रार दाखल केली; परंतु पोलिसांकडून काहीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे न्यायालयात धाव घेतल्याचे यास्मिन यांनी तक्रारीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com