उच्च न्यायालयाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण
उच्च न्यायालयाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण
सेवाज्येष्ठतेच्या क्रमवारीनुसार सोमवारपासून अंमलबजावणी
सकाळ वृत्तसेवा,
मुंबई, ता. ४ : उच्च न्यायालयाच्या कामकाजाचे सोमवारपासून (ता. ७) थेट प्रक्षेपण (लाइव्ह-स्ट्रीमिंग) करण्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. सुरुवातीला सेवाज्येष्ठतेनुसार क्रमवारीतील पहिल्या पाच न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण होणार आहे. त्यानंतर हळूहळू उच्च न्यायालयातील सर्व खंडपीठ, एकलपीठांच्या कामकाजांचेही थेट प्रक्षेपण सुरू केले जाणार आहे.
न्यायालयीन कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याची मागणी करणारी जनहित याचिका वकील मॅथ्यूज नेदुमपारा यांनी केली होती. त्यावरील मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, सर्व न्यायमूर्तींनी एकमताने काही न्यायालयांतील कामकाजाच्या थेट प्रक्षेपणासाठी ठराव मंजूर केल्याचे म्हटले होते. त्यादृष्टीने तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर सुरुवातीला उच्च न्यायालयातील सेवाज्येष्ठता क्रमवारीतील पहिल्या पाच न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठांच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण होईल, असे मुख्य न्यायमूर्तींनी स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर, सेवाज्येष्ठतेनुसार क्रमवारीतील पहिल्या पाच न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाच्या कामकाजाचे सोमवारपासून थेट प्रक्षेपण होणार आहे.
......
उच्च न्यायालय प्रशासनाच्या या निर्णयानुसार मुख्य न्या. आराधे आणि न्या. संदीप मारणे, न्या. रेवती मोहिते-डेरे आणि न्या. नीला गोखले, न्या. एम. एस सोनक आणि न्या. जितेंद्र जैन, न्या. रवींद्र घुगे आणि न्या. मिलिंद साठये, तसेच न्या. अजय गडकरी आणि न्या. राजेश पाटील यांच्या खंडपीठाच्या कामकाजाचे प्रक्षेपण होईल.
......
संवेदनशील प्रकरणांचे प्रक्षेपण नाही.
सर्वोच्च न्यायालयातील खटल्यांचेही थेट प्रक्षेपण केले जाते, तर गुजरात, कर्नाटक आणि ओडिशासह इतर उच्च न्यायालयांनीही आधीच कामकाजाचे थेट प्रक्षेपण सुरू केले आहे. तथापि, बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पोक्सो) दाखल प्रकरणे, बलात्काराच्या प्रकरणे, वैवाहिक वाद, वैद्यकीय गर्भपात, लिंग-आधारित हिंसाचार किंवा राष्ट्रीय सुरक्षेच्या चिंतांशी संबंधित प्रकरणांसारख्या संवेदनशील प्रकरणांच्या सुनावण्यांचे थेट प्रक्षेपण होणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.