ट्रेलरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
ट्रेलरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
पनवेल, ता. ४ (वार्ताहर) : मुंबई येथून माणगाव येथे जाणाऱ्या दुचाकीला गुरुवारी (ता. ३) रात्री भरधाव ट्रेलरने धडक दिली. पनवेल येथील पळस्पे येथे झालेल्या या अपघातात दुचाकीस्वार राहुल रामदास ढेपे (वय ३८) याचा मृत्यू झाला. पनवेल शहर पोलिसांनी या अपघातातील ट्रेलरचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.
राहुल मुंबईतील वडाळा येथे राहण्यास होता. गुरुवारी रात्री राहुल दुचाकीवरून माणगाव येथे जात होता. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्याची दुचाकी जुन्या मुंबई-पुणे मार्गावरील पनवेल-पळस्पे पुलाजवळ आली असता, भरधाव ट्रेलरने त्याच्या दुचाकीला धडक दिली. यात राहुल गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्याला उपचारासाठी पनवेल येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.