कोकणात बाजार समित्यांना जागा उपलब्ध करून द्या

कोकणात बाजार समित्यांना जागा उपलब्ध करून द्या

Published on

कोकणात बाजार समित्यांना जागा उपलब्ध करून द्या
प्रवीण दरेकर यांची मागणी

मुंबई, ता. ४ : कोकणात कृषी उत्पन्न बाजार समित्यांची कमतरता असल्याने तेथे जास्त बाजार समित्या निर्माण कराव्यात, अशी मागणी विधान परिषदेतील भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी आज येथे केली.
विधान परिषदेत विरोधी पक्षाच्या कलम २६० अन्वये प्रस्तावावर ते बोलत होते. राज्यात प्रत्येक तालुक्यात शेतमाल विक्रीची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे; अन्यथा शेतकऱ्यांना दुसऱ्या तालुक्यात जावे लागते आणि त्यांचा वाहतुकीचा खर्च आणि वेळ वाया जातो. राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी ६८ तालुक्यांमध्ये बाजार समित्या नाहीत, असेही दरेकर यांनी सांगितले. सरकारने ६५ तालुक्यांमध्ये बाजार समित्या स्थापन करण्याचा तत्त्वतः निर्णय घेतला आहे. मात्र, यासाठी कोकणात पाच एकर जागेची गरज आहे. कोकणात कृषी उत्पन्न बाजार समित्या कमी आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या ठिकाणी बाजार समित्यांची गरज आहे. त्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून दिल्यास कोकणातील उत्पादने बाजारपेठ आणण्यासाठी त्या काम करतील. त्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, असेही दरेकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com