यंदाचा गणेशोत्सवात पर्यावरणपूरक

यंदाचा गणेशोत्सवात पर्यावरणपूरक

Published on

भिवंडी (वार्ताहर)ः शहरात एकात्मतेचा गौरवल्या जाणाऱ्या धामणकर नाका मित्र मंडळ, स्वाभिमान सेवा संस्थेच्या वतीने गणेशोत्सवाचे ३७वे वर्ष पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे केले जाणार आहे. यानिमित्ताने इकोफ्रेंडली गणेशमूर्ती बसवण्यात येणार आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती बनविण्यात येतात. त्यामुळे पर्यावरणाची हानी, विशेषतः जलप्रदूषण होत असते. उच्च न्यायालयाने व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही, पर्यावरणाचे रक्षण व्हावे, या दृष्टीने सार्वजनिक मंडळांना सूचना केल्या आहेत. त्यानुसार मंडळाच्या सर्वसाधारण बैठकीत सार्वजनिक गणेशोत्सवात यंदा प्रथमच पर्यावरणपूरक इकोफ्रेंडली गणेशमूर्ती बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई लालबाग येथील श्री गणेश चित्रकला मंदिरचे मूर्तिकार सुशांत पोहेकर यांच्याशी संवाद साधून त्यांच्याकडून पर्यावरणपूरक मातीची गणेशमूर्ती तयार करण्यासाठी करार केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com