सफाई कामगारांसाठी नमस्ते योजना
सफाई कामगारांसाठी ‘नमस्ते’ योजना
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ५ ः मल साठवणूक आणि वाहतुकीच्या सफाईचे काम करताना अनेकदा अपघात घडतात. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी केंद्र, राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनातर्फे ‘नमस्ते’ योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचाच एक भाग म्हणून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांसाठी गुरुवारी (ता. ३) कामा फाउंडेशनतर्फे सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून केंद्र, राज्य आणि महापालिका प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने सफाई कर्मचाऱ्यांचे प्रबोधन केले जात आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात पार पडलेल्या सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळेत सिवर - सेप्टिक टँकची सफाई करताना कर्मचाऱ्यांनी कशाप्रकारे सुरक्षेची काळजी घ्यावी, कोणती उपकरणे वापरावीत, स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, आदी प्रमुख मुद्द्यांवर कामा फाउंडेशनच्या तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या जलनिस्सारण/मलनिस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता घन:श्याम नवांगुळ यांनी दिली. या कार्यशाळेला उपस्थित सफाई कर्मचाऱ्यांची नोंदणी करून त्यांना लागू असणारे शासकीय लाभ उपलब्ध करून देण्यासाठीही कार्यवाही केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत सफाई मित्र व सफाई कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजनदेखील केले होते. त्याचा लाभ उपस्थित सफाई कामगारांनी घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.