नोकरभरती अर्जप्रक्रियेसाठी मुदतवाढ

नोकरभरती अर्जप्रक्रियेसाठी मुदतवाढ

Published on

नोकरभरती अर्ज प्रक्रियेसाठी मुदतवाढ
उमेदवारांच्या मागणीनंतर महापालिकेचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ५ : कल्याण-डोंबिवली महापालिकेत विविध विभागांतील एकूण ४९० तांत्रिक व कार्मिक पदांची भरती सरळसेवा पद्धतीने करण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३ जुलै होती; मात्र मध्यंतरी वेबसाईटवर तांत्रिक अडथळे येऊन ती सुरू होत नसल्याने उमेदवारांमध्ये नाराजीचे वातावरण होते. इच्छुकांनी अर्जाची मुदत वाढविण्याची मागणी केली होती. त्यानुसार विचार करून पालिका प्रशासनाने अर्ज करण्याची मुदत १५ जुलैपर्यंत वाढवली आहे; अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी दिली.

महापालिकेकडून अनेक वर्षांनंतर मोठ्या प्रमाणावर नोकरभरती प्रक्रिया राबवली जात आहे. १० जून रोजी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करून या भरतीबाबतची माहिती जाहीर केली होती. यामध्ये विविध विभागांमधील तांत्रिक आणि कार्मिक पदांसाठी एकूण ४९० रिक्त जागा भरण्यात येणार आहे. टीसीएस कंपनीमार्फत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. गुरुवारी (ता. ३) अर्ज करण्याची अंतिम तारीख होती; मात्र अनेक इच्छुकांना वेळेअभावी अर्ज नोंदवता न आल्याने अर्जाची मुदत वाढवावी, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर महापालिकेने सकारात्मक निर्णय घेत अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जुलैपर्यंत वाढवली आहे.

अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी सांगितले, की ज्यांना वेळेअभावी अर्ज करता आले नाहीत, त्यांच्यासाठी ही संधी महत्त्वाची आहे. सर्व इच्छुक उमेदवारांनी १५ जुलैपूर्वी अर्ज पूर्ण करून ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत. अर्ज प्रक्रियेमध्ये अडचणी येणाऱ्या उमेदवारांनी महापालिकेच्या अधिकृत हेल्पलाइन क्रमांक किंवा ई-मेल आयडीवर संपर्क करून मदतीची मागणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com