खाडी किनारी संक्शन पंप नष्ट
खाडीकिनारी संक्शन पंप नष्ट
कल्याण-डोंबिवलीत ३० लाखांचा मुद्देमाल केला नष्ट
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ४ : कल्याण व डोंबिवली खाडी परिसरात कल्याण महसूल विभागाने कारवाई करत ३० लाखांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. कल्याण रेतीबंदर ते डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखान पाडा येथील खाडी परिसरात कल्याण तहसील कार्यालयातील महसूल विभागाच्या पथकाला गुरुवारी (ता. ३) बोटीच्या सहाय्याने गस्त घालताना त्यांना बेकायदा रेती उत्खनन सुरू असल्याचे आढळून आले. पथकाने त्वरित कारवाई करत खाडीपात्रात दोन बार्जेस व चार संक्शन पंप नष्ट केले.
कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण तहसील कार्यालयाचे पथक गुरुवारी कल्याण रेतीबंदर ते डोंबिवली कुंभारखाण पाडा या ठिकाणी बोटीच्या सहाय्याने गस्त घालत होते. खाडीपात्रात दोन बार्जेस व चार संक्शन पंपाद्वारे बेकायदा रेती उत्खनन सुरू असल्याचे आढळून आले. पथकातील मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी पाहताक्षणी सदर बार्जेस व संक्शन पंपावर काम करणाऱ्या मजुरांनी खाडीपात्रात विरुद्ध दिशेने उड्या मारून खाडीपात्राच्या किनाऱ्याच्या दिशेने पोहून पळून गेले. दोन बार्जेस व चार संक्शन पंप हे अवजड असल्याने खाडीपात्रातून बाहेर काढणे शक्य झाले नाही. पथकाने बार्जेसचे इंजिनमध्ये साखर व रेती टाकून इंजिन नादुरुस्त करून सदरच्या बार्जेस आग लावून पेटवून दिल्या. तसेच बार्जेस समवेत असलेल्या संक्शन पंपाला गॅस कटरने होल करून खाडीपात्राच्या मध्यभागी बुडवले.
नादुरुस्त व पेटवून दिलेल्या दोन बार्जेसची अंदाजे किंमत १४ लाख व चार संक्शन पंपांची अंदाजे किंमत १६ लाख असा एकूण ३० लाखांची साधन सामग्री नादुरुस्त करून नष्ट केल्याची माहिती महसूल विभागाने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.