जपानमध्ये शिक्षणाच्या विविध संधी
राजीव डाके ः सकाळ वृत्तसेवा
ठाणे शहर, ता. ५ ः जपानमध्ये शिक्षणाच्या विविध संधी आहेत, परंतु मुलांना, पालकांना तथा शिक्षण संस्थांना त्याची जाणीव नाही. तसेच सरकारसुद्धा अनुत्सुक आहे. त्यामुळे विद्यापीठात एआय, मेकॅनिक, रोबोटिक यांसारख्या विषयांच्या शिक्षणासाठी तरी किमान मुलांना पाठवले पाहिजे, परंतु त्यासाठी साधे अर्जही येत नसल्याची शोकांतिका जपानचे आमदार योगेंद्र पुराणिक यांनी व्यक्त केली.
मराठी उद्योजकता सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या वतीने ठाण्यात विशेष कार्यक्रम करण्यात आला. भारतीय विद्यार्थ्यांना फारच कमी खर्चात जपानी तंत्रज्ञानाचे शिक्षण घेता येईल. कमी खर्चात जपानमध्ये शिक्षणाची संधी उपलब्ध आहे. भारत आणि जपान या दोन्ही देशांनी एकमेकांच्या विद्यापीठाशी एक वर्ष त्यांचे विद्यार्थी येतील. एक वर्ष आपले विद्यार्थी त्यांच्याकडे जातील, असा प्रयोग करायला हवाय. भारतात, महाराष्ट्रात आलो असून, महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटलो आहे. या विषयावर चांगली चर्चा झाली असून, त्यांनी महाराष्ट्रतील शिक्षण पद्धतीत असे पाऊल उचलण्याची तयारी दर्शविली आहे. जपान सरकारशी बोलणार आहे. आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी जपानमध्ये आणखी काय सुविधा घेता येतील, असे विचारले असता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांवर मोठा ताण असतो.
-------------------------------------------------
कौशल्य आत्मसात करणे गरजेचे
महाराष्ट्रात येणाऱ्यांना अडवण्यासाठी भिंती बांधू शकत नाहीत. त्यासाठी एकमेकांमधील गुणवत्ता वाटून घ्यायला पाहिजे. आपल्यात हे कौशल्य आहे. ते इतर राज्यातील लोकांना दिले पाहिजे, त्यांचे कौशल्य आपण घेतले पाहिजे. अशा प्रकारे देश पुढे नेला पाहिजे. जपानी लोक आपसात हेवेदावे करत नाहीत, सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जातात. राष्ट्रीयत्व जागवून कामे केले पाहिजे, असेही पुराणिक यांनी सांगितले.
-------------------------------------------------
अबंरनाथ ते जपानचा प्रवास
माझा जन्म अंबरनाथमध्ये झाला. दहावीपर्यंतचे शिक्षण जन्म ठिकाणी, महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. त्यानंतर कोलकाता, जपान, चीन, फ्रांस येथे गेलो. जपानमध्ये पहिले भारतीय रेस्टॉरंट सुरू केले. २०२१ मध्ये निवडणुकीत आमदार म्हणून जिंकून आलो. आपल्याकडे जशा आयएएस परीक्षा असतात. तशी परीक्षा दिली. तेथील सरकारने शिक्षण विभागात घेतले. या विभागात १३५ जपानी अधिकारी हाताखाली काम करत आहेत.
-------------------------------------------------
पुराणिक बनले दुभाषिक
पुराणिक यांनी मुंबई भेटीतील चंद्रकांत पाटील यांचा किस्सा अभिमानाने सांगितला. पुराणिक म्हणाले की माझ्यासोबत काही जपानी अधिकारी होते. ते इंग्रजीत बोलत होते. त्यावर पाटील म्हणाले, तुम्ही माझ्याशी मराठी बोला आणि ते त्यांना जपानी भाषेत सांगा. यावर मी मोठ्या आनंदाने त्यांच्यासाठी दुभाषिक बनलो, अशी आठवण पुराणिक यांनी सांगितली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.