पशेणी गावातील तरुणाचे कौतुक
मुरबाड, ता. ५ (बातमीदार)ः मुरबाडजवळील मडक्याच्या पाडा येथे रस्त्यावर पडलेला मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता होती. त्यामुळे प्रशासनाकडून मदतीपेक्षा पशेणी गावातील आकाश धुमाळ तरुणाने स्वतःच खड्डा बुजवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
पशेणी गावातील आकाश धुमाळ हा तरुण त्याच्या तीन चाकी टेम्पोतून सामान घेऊन मुरबाड ते सरळगाव प्रवास करत होता. मडक्याचा पाडा गावापुढे शिवम ऑक्सिजन कंपनीसमोर रस्त्यावर पाणी साठल्याने त्याला खड्ड्यांचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्याच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. खड्ड्यात आपटल्यामुळे या ठिकाणी बऱ्याच वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. काही दुचाकीस्वार अपघातामुळे जखमीसुद्धा झाले आहेत. त्यामुळे दुसऱ्या कोणाबरोबर असा प्रसंग घडू नये, म्हणून या तरुणाने मित्रांसोबत हा मोठा खड्डा बुजवला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.