शहापूरचे वारकरी पंढरपूरकडे रवाना

शहापूरचे वारकरी पंढरपूरकडे रवाना

Published on

किन्हवली, ता. ५ (बातमीदार)ः शहापूर तालुक्यातील भक्तांना घेऊन मोफत पंढरपूरवारीसाठी राज्य महामंडळाच्या ४० बस पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. यात महिला व पुरुष भाविकांच्या आरोग्याच्या काळजीसाठी संघटनेने वैद्यकीय उपचार व्यवस्था समूहसुद्धा सोबत ठेवला आहे.
आषाढी एकादशीला विठ्ठलभक्त वारकऱ्यांना पंढरीची ओढ लागते. विठ्ठल दर्शनासाठी पंढरीच्या वारीसाठी विठ्ठलभक्त धाव घेतात. काही भक्तांना पायी चालत वारी करणे शक्य होत नाही, पण विठ्ठल दर्शनाची आस शांत राहू शकत नाही, अशा शहापूर तालुक्यातील वारकऱ्यांची सोय व्हावी यासाठी जिजाऊ संघटनेच्या नीलेश सांबरे यांनी मोफत पंढरपूर वारीची व्यवस्था केली आहे. मोफत दर्शन यात्रेत भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी संघटनेने वैद्यकीय उपचार व्यवस्था समूहसुद्धा सोबत ठेवला आहे. जिजाऊचे शहापूर तालुकाध्यक्ष हरेश पष्टे व त्यांचे विभागीय पदाधिकारी सुदर्शन पाटील, विनोद बांगर, आकाश पानसरे, नितीन बांगर, प्रवक्ते अमर राऊत यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातून राज्य परिवहन महामंडळाच्या ४० बस आज (ता. ५) सकाळी पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com