गंजाड येथे सर्पदंशाने मुलीचा मृत्यू
कासा, ता. ५ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील गंजाड सोमनाथ खडकीपाडा येथे शुक्रवारी (ता. ४) सकाळी एका दहावर्षीय मुलीचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. वैशाली चिपात असे या मुलीचे नाव होते. सध्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतीची कामे सुरू असल्याने तिचे आई-वडील शेतात काम करण्यासाठी गेले होते. शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ती आई-वडिलांसाठी जेवण तयार करण्यासाठी घराच्या मागील झोपडीतील लाकडे काढायला जाण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी तिला अचानक सापाने दंश केला. त्यानंतर तिने जोरात आरडाओरड केली. आवाज ऐकताच शेजाऱ्यांनी धाव घेतली आणि तिला तत्काळ गंजाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. तेथील डॉक्टरांनी तिला त्वरित पुढील उपचारासाठी डहाणू येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये पाठवण्याचा सल्ला दिला; मात्र रुग्णवाहिकेतून डहाणूला नेत असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर वैद्यकीय प्रक्रिया आणि पोलिस कारवाईनंतर तिचा मृतदेह परिवाराकडे सोपवण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.