लाखोंचे दागिने घरातून लंपास

लाखोंचे दागिने घरातून लंपास

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : नौपाडा परिसरातील सिद्धेश्वर तलाव आणि भास्कर कॉलनी या दोन ठिकाणी असलेल्या चाळीत घरफोडी करत, त्या दोन घरांमधून तब्बल साडेतेरा लाखांहून अधिक किमतीचे सोने-चांदीचे दागिने घेऊन पोबारा केला आहे.
भास्कर कॉलनी येथील सेठ चाळ येथे राहणाऱ्या संजय भैनवार यांच्या घरी चोरी झाली आहे. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाचे कर्मचारी असून, त्यांनी दिलेल्या तक्रारीत, त्यांचे तळ अधिक एक मजली घर आहे. घर रोडलगत असल्याने पावसाळा सुरू झाल्याने दोन आठवड्यांपासून खालच्या घराला लॉक लावून वरच्या मजल्यावर झोपत आहेत. बुधवारी (ता. २) रात्री ११ वाजता जेवण करून खालच्या मजल्यावरच्या मजल्यावर झोपण्यास गेले. गुरुवारी (ता. ३) सकाळी ६च्या सुमारास त्यांची पत्नी चावी घेऊन खाली आल्यावर घराचा दरवाजा उघडा दिसला. घरात जाऊन पाहणी केल्यावर कपाटातील पाच लाख ६० हजारांचे मंगळसूत्र, दोन चेन, बांगड्या, कानातील झुमके, अंगठी आदी सोन्याचे दागिने आणि रोख पाच हजार ऐवज चोरीला गेला. दुसऱ्या घटनेत वाहनचालक असलेले संदेश शिंदे यांच्या घरी चोरी झाली आहे. सिद्धेश्वर तलाव परिसरामधील ओमसाई आशीर्वाद चाळीत राहणारे शिंदे आणि त्यांची पत्नी घराला लॉक करून गुरुवारी (ता. ३) सकाळी कामाला गेले. चोरट्यांनी त्यांच्या घराचे लॉक तोडून देव्हाऱ्याच्या खालील ड्राव्हरमधील आठ लाख पाच हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. या घटनेत सोन्याचे मंगळसूत्र, चेन, कानातील झुमके, नेकलेस, बांगड्या, महिला आणि पुरुषांच्या अंगठ्या अशा सोन्याच्या ऐवजांचा समावेश असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com