ठाणे पोलिस दलाच्या करनाळे यांनी अमेरिकेत फडकवला तिरंगा

ठाणे पोलिस दलाच्या करनाळे यांनी अमेरिकेत फडकवला तिरंगा

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : अमेरिका बर्मिंघम अलाबामा येथे पार पडलेल्या लॅटिन अमेरिकन वर्ल्ड पोलिस फायर गेम्स २०२५ या स्पर्धेत ठाणे शहर पोलिस दलातील महाराष्ट्र पोलिस क्रीडा अधिकारी तथा महिला पोलिस उपनिरीक्षक डॉ. स्नेहा करनाळे यांनी वुमेन फिजिक (बिकनी) या क्रीडा प्रकारामध्ये सुवर्णपदक व शरीरसौष्ठव या क्रीडा प्रकारात रौप्यपदक अशा दोन पदकांवर नाव कोरले आहे. या पदकांनी ठाणे जिल्हा किंवा महाराष्ट्रच नाहीतर देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. अशा प्रकारे क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळविणाऱ्या डॉ. करनाळे या महाराष्ट्र पोलिस दलातील पहिल्या महिला पोलिस ठरल्या आहेत.
लॅटिन अमेरिकन वर्ल्ड पोलिस फायर गेम्स ही स्पर्धा अमेरिका बर्मिंघम अलाबामा येथे २७ जून ते ६ जुलैदरम्यान आयोजित केली आहे. या स्पर्धेत ७३ देशांनी सहभाग नोंदवला आहे. तसेच करनाळे यांनी वुमेन फिजिक (बिकनी) या क्रिडा प्रकारमध्ये सुवर्णपदक व शरीरसौष्ठव या क्रीडा प्रकारामधे रौप्यपदक पटकावून महाराष्ट्र पोलिस दलाचा मान, सन्मान, प्रतिष्ठा वाढवून देशातच नव्हे, तर संपूर्ण जगात महाराष्ट्र पोलिस दलाचे नाव उंचावलेले आहे. या स्पर्धेतील महिला आणि पुरुष गटात करनाळे यांच्यासह तिघे देशातून अमेरिकेत रवाना झालेले आहेत.

यापूर्वीही डॉ. करनाळे यांनी महाराष्ट्र पोलिस गेम्सच्या महिला गटात सुवर्णपदक, आंतराराष्ट्रीय पातळीवर सुवर्ण, रौप्य, कांस्य अशा पदकाची कमाई करून देशाची मान आंतरराष्ट्रीय पातळीवर उंचावली आहे.

शर्यतीत पदकाची अपेक्षा
ठाणे शहर पोलिस दलातील महिला पोलिस करनाळे या २०० मीटर शर्यतीतही सहभागी होणार आहेत. या स्पर्धेतही पदक नावावर करण्यासाठी त्या सर्वोत्तम देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com