आंतरशालेय योग स्पर्धेत ३० शाळांचा सहभाग

आंतरशालेय योग स्पर्धेत ३० शाळांचा सहभाग

Published on

ठाणे : येथील श्री माँ विद्यालयाच्या वतीने सहाव्या आंतरशालेय योग स्पर्धा नुकतीच घेण्यात आली होती. या स्पर्धेत शहर आणि शहराबाहेरील ३० शाळा सहभागी झाल्या होत्या. शाळांमधील मुलांसाठी आयोजित योग स्पर्धेत पाचवी ते दहावीमधील ठाणे, डोंबिवली, बोरीवली, बदलापूर, अंबरनाथ इत्यादी शाळांतील विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेत विविध योगासनांच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. एकूण ३० शाळांमधील सहभागी विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांचे गुणवत्ता प्रशस्ती प्रमाणपत्र व चषक देण्यात आली. ही स्पर्धा व्यक्तिगत आणि समूह या दोन स्वरूप श्रेणींमध्ये घेण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com