दुग्ध व्यावसायिकाच्या घरात चोरी

दुग्ध व्यावसायिकाच्या घरात चोरी

Published on

अंबरनाथ, ता. ५ (वार्ताहर) : कुटुंबासह देवदर्शनाला जाणे अंबरनाथमध्ये एका दुग्ध व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले आहे. चोरट्याने याच संधीचा फायदा घेऊन हातसाफ केला. घराचा कडीकोयंडा तोडून घरातून एक लाख पाच हजारांचे सोने व रोकड लंपास केली. ही संपूर्ण घटना घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. यासंदर्भात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अंबरनाथ पूर्वेला पालेगावामध्ये रॉयल फ्लोराजवळ रामकृष्ण हरी कम्पा‍उंड येथे दिगंबर म्हात्रे हे परिवारासह राहत असून ते दूध व्यावसायिक आहेत. २७ जूनला ते परिवारासह पंढरपूरच्या वारीसाठी गेले होते. त्यांचे घर बंद असल्याने चोरट्याने घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातून १५ हजारांची रोकड आणि दोन तोळे सोन्याचे दागिने चोरी करून पलायन केले. ही घटना २८ जूनला पहाटे साडेचार-पाचच्या सुमारास घडली. दरम्यान, म्हात्रे घरी आल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. त्यांनी तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेऊन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com